Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज

Rain Update : राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

Team Agrowon

Weather News : पुणे : राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर, अजमेर, गुना, रायसेन, मंडला, पेंद्रारोड ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र टिकून आहे.

कोकण, घाटमाथ्यासह राज्यात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावर काही अतिवृष्टी झाली. दावडी येथे उच्चांकी १४० मिलिमीटर, शिरगाव येथे १०८ मिलिमीटर पाऊस झाला. आज (ता. ३०) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘येलो’ अलर्ट आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT