Rain Update  Agrowon
हवामान

Rain Update : कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Monsoon Rain : सक्रिय मॉन्सून, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी (ता. २६) पावसाचा जोर ओसरला होता. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

Team Agrowon

Weather News : पुणे : सक्रिय मॉन्सून, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी (ता. २६) पावसाचा जोर ओसरला होता. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्‍चिम बंगाल, बांगलादेश परिसरावरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून, रोहतक, दिल्ली, आग्रा, सिधी, दाल्तोंगंज ते कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्याने शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली. घाटमाथ्यावरील दावडी आणि खंद येथे ३१० मिलिमीटर पाऊस झाला. कोकण, घाटमाथ्यावर बऱ्याच ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. उर्वरित राज्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
आज (ता. २७) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा तसेच गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर ठाणे, मुंबई, कोल्हापूर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, मुंबई, कोल्हापूर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, भंडारा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT