Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे का? राज्यात आज पावसाची स्थिती काय होती?

Weather Update : राज्यातील हवामान विचार करता, अनेक भागात आज सकाळी हवेतील गारवा वाढलेला दिसला.

अनिल जाधव

Pune News : देशाच्या काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. तर ईशान्य भाग आणि दक्षिण भागात पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात मात्र आज जोरदार पावसाची नोंद नव्हती.
आग्रनेय तेलंगणा आणि शेजारच्या दक्षिण छत्तीसगड तसेच ओडिशाचा दक्षिण भाग आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली होती.

हे ठळक कमी दाब क्षेत्र आता कमी दाब क्षेत्रात रुपांतरीत झाले आहे. तसेच दक्षिण छत्तीसगड आणि शेजारच्या विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती दिसून येत आहे. पश्चिमी विक्षोप चक्राकार वाऱ्याची स्थिती हरियाना आणि शेजारच्या भागात दिसून येत आहे.

या सर्व परिस्थितीमुळे आसाम, मेघालय, नागालॅन्ड, मनिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तसेच केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल भागात पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील हवामान विचार करता, अनेक भागात आज सकाळी हवेतील गारवा वाढलेला दिसला. तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणही होते. काही ठिकाणी पावसाची नुसतीच भूरभूर झाली. पण मोठ्या पावसाची नोंद नव्हती. तसेच पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: भूम तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींवर प्रशासक बसणार?

Land Acquisition Issue: भूसंपादन न करताच रस्त्याचे काम सुरू

Sugarcane Crushing Season: धाराशिव जिल्ह्यात ऊस गाळपाची बुलेट ट्रेन सुसाट

Panand Road: ...अखेर खुला झाला कुरवलीचा पाणंद रस्ता

Fertilizer Import: युरियाची आयात वाढली; देशांतर्गत उत्पादन घटले

SCROLL FOR NEXT