Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात

Rabi Crop : रब्बी हंगामातील हरभरा, गहू तसेच खरिपातील तूर, कपाशी पिकांना गेल्या आठवड्यातील पावसाचा तडाखा बसला.
Cloudy Weather
Cloudy Weather Agrowon
Published on
Updated on

Washim News : रब्बी हंगामातील हरभरा, गहू तसेच खरिपातील तूर, कपाशी पिकांना गेल्या आठवड्यातील पावसाचा तडाखा बसला. त्यानंतर आता सतत धुके पडत असल्याने परिणामी अळ्यांचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रब्बी हंगाम धोक्यात येण्याची भिती तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

तालुक्यातील करडा या गावातील शेतकरी अरविंद केशवराव देशमुख यांनी खरिपातील उत्पादनाची घट रब्बीत भरून काढण्यासाठी मोठ्या मेहनतीने व कष्टाने आपल्या शेतातील तूर व हरभरा पिकांना सिंचनाद्वारे पाणी दिले होते. मात्र अचानक पडलेल्या पावसाने त्यांचे गणित चुकवले आहे. संपूर्ण शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जेमतेम अवकाळीने थोडी उसंत घेतली तर, लगेचच पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

Cloudy Weather
Rabi Sowing : नगर जिल्ह्यात रब्बीची ५४ टक्के पेरणी

त्याचा दुष्परिणाम देशमुख यांच्या तूर व हरभरा पिकावर झाला आहे. तुरीचे पीक वाळून चालले असून, शेंगा पक्व होण्याआधीच करपून गेल्या आहेत. हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील हरभऱ्याचे पीक वीस ते पंचवीस टक्के प्रमाणात मरमुळे उद्‍ध्वस्त झाले.

Cloudy Weather
Rabi Sowing : पावसामुळे रब्बी पेरण्या खोळंबल्या

याबाबत कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले असता, शेतकरी उत्पादन वाढीसाठी व अळ्यांच्या बंदोबस्तासाठी कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर करीत असल्याने बुरशीचे प्रमाण वाढत आहे. त्या कारणाने सुद्धा मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळाली असल्याचे शेतकरी अरविंद देशमुख यांनी सांगितले.

पाऊस व ढगाळ वातावरणामुळे उद्‍भवलेल्या दूषित वातावरणात तुरीमध्ये फूलगळ आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव संभवतो. यासाठी शेतकऱ्यांनी सायंकाळी शेतात धूर करावा व तुरीमध्ये शिफारशीत केलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करावी. जमिनीत विविध रोग निर्माण करणाऱ्या बुरशीच्या बंदोबस्तासाठी प्रतिबंधित ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक ड्रीचिंगद्वारे जमिनीत सोडल्यास उपरोक्त समस्यांना अटकाव केला जाऊ शकतो.
- राजेश डवरे, कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com