Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढणार

Rain Forecast : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावरही पावसाची संततधार सुरू असतानाच, राज्यात पावसाच्या सरींनी आशा पल्लवीत झाल्या आहेत.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावरही पावसाची संततधार सुरू असतानाच, राज्यात पावसाच्या सरींनी आशा पल्लवीत झाल्या आहेत. आज (ता. १४) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे आलेला असून, राजस्थानच्या श्री गंगानगरपासून हिस्सार, दिल्ली, बाराबंकी, देहरी, असनसोल ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

उत्तर गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. महाराष्ट्रापासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला. रत्नागिरी येथे १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. राज्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. राज्यात ढगाळ हवामान असून, पावसाची उघडीप असलेल्या ठिकाणी उकाड्याने घाम निघत असून, पावसाची आवश्यकता आहे.

राज्यात पाऊस पुन्हा सुरू झाला असून, आज (ता. १४) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे. ठाणे, रायगड आणि पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आहे. मुंबई, पालघर, अकोला, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

ठाणे, रायगड, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, मुंबई, अकोला, अमरावती, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT