Winter Season : महाराष्ट्रात आजपासून ते गुरुवार (ता. ५ ते ९) या कालावधीत हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कमी राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. शुक्रवार (ता. १०)पासून कमाल व किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. त्या वेळी महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीत वाढ होऊन थंडीची तीव्रता जाणवेल. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
वायव्य भारतावर हवेचे दाब १०१६ हेप्टापास्कल इतके वाढतील. वारे वायव्य भारतातून व उत्तर भारतातून दक्षिण दिशेने वाहतील आणि थंड वारे उत्तरेकडून वाहण्यामुळे थंडीत वाढ होईल. प्रशांत महासागर, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे ‘एल निनो’चा प्रभाव जाणवणार नाही. समान तापमान राहण्यामुळे राज्यात थंडी टिकून राहणे शक्य आहे. त्याचा फायदा आंबा फळपिकास लवकर मोहर लवकर निघण्यास होईल. १ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात परतीच्या मॉन्सूनचा पाऊस झाली नाही.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोकण
कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस तर पालघर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४० ते ४७ टक्के, तर रत्नागिरी जिल्ह्यात ५४ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ७४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ ते २५ टक्के, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३२ ते ३६ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अत्यल्प ०.२ ते ०.९ मिमी पावसाची शक्यता राहील.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, नाशिक व धुळे जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३४ ते ३७ टक्के, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ४२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य, पूर्व व आग्नेयेकडून राहील.
मराठवाडा
धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर, नांदेड, जालना व परभणी जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत आकाश बऱ्यापैकी ढगाळ राहील; तर बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. बीड, हिंगोली व छ. संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३९ टक्के, तर धाराशिव, नांदेड व परभणी जिल्ह्यांत ६० ते ६४ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ २० टक्के ते ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४० ते ४५ टक्के, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ५२ टक्के इतकी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २४ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ
कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २८ ते २९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सर्व जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि गडचिरोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ६४ टक्के, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ५२ टक्के, तर गोंदिया जिल्ह्यात ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते ३२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान सातारा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर नगर, पुणे, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर पुणे व नगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व नगर जिल्ह्यांत ३८ ते ४६ टक्के, तर सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ५१ ते ५६ टक्के राहील. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ४६ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ४२ टक्के राहील. उर्वरित सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ टक्के आणि नगर जिल्ह्यात २२ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. हवामान कोरडे राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता आहे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
कृषी सल्ला
हरभरा व गव्हाची पेरणी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.
सोयाबीन पिकाची काढणी करून प्रखर सूर्यप्रकाशात वाळवून नंतर साठवण करावी.
पूर्व हंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी.
कुक्कुट पक्ष्यांच्या व्यवस्थापनात हवामानाचा अंदाज घेऊन योग्य बदल करावेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.