Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : चार दिवस अनेक ठिकाणी मुसळधारेचे संकेत; रविवारपर्यंत राज्यातील अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : चालू आठवड्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज माणिकराव खुळे यांनी दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या अनेक भागात आजही पावसाने हजेरी लावली. तर काही भागात ढगाळ वातावरणासह ऊन पावसाचा खेळ सुरु होता. राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर चालू आठवड्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज माणिकराव खुळे यांनी दिला.

माणिकराव खुळे यांनी सांगितले की, सध्या भारत महासागर विषुववृत्तीय परिक्षेत्रात असलेली एम.जे.ओ. ची उपस्थिती आणि सध्या होत असलेली कमाल तापमानातील वाढ यामुळे पुढील संपूर्ण सप्ताहात म्हणजे रविवार २५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात शक्यतो दुपारनंतर 'उष्णता संवहनी' प्रक्रियेतून वीजा  आणि ढगांच्या  गडगडाटीसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे, हे देखील श्री. खुळे यांनी सांगितले. आज म्हणजेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशा ११ जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज, असल्याचे श्री. खुळे यांनी सांगितले.

उद्या म्हणजेच बुधवारी मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील एकूण १८ जिल्ह्यांमधील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तर गुरुवारी आणि शुक्रवारी म्हणजेच २२ आणि २३ ऑगस्ट रोजी नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, कोल्हापूर, आणि मुंबईसह संपूर्ण कोकण तसेच संपूर्ण विदर्भातील अशा एकूण ३३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असल्याचेही श्री खुळे यांनी स्पष्ट केले.

शनिवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी तसेच मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भातील सर्व जिल्हे अशा २६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर रविवारी म्हणजेच २५ ऑगस्ट रोजी मराठवाडा वगळता महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याचे श्री. खुळे यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT