Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानात वाढ कायम राहणार

Weather News : पावसाला पोषक वातावरण, ढगाळ हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक वातावरण, ढगाळ हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात पाऊस आणि गारपीट झाली. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

राज्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून, आज (ता. १३) राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. सोमवारी (ता. १२) पंजाबमधील अमृतसर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर भारतातील राज्यांमध्ये किमान तापमान ७ ते १२ अंशांच्या दरम्यान आहे. मराठवाडा आणि दक्षिण विदर्भातील दोन चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती, कर्नाटक किनाऱ्यापासून मराठवाडा ते विदर्भापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे.

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी पाऊस झाला असून, विदर्भापाठोपाठ मराठवड्यातही पाऊस गारपिटीने हजेरी लावली आहे. नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर, मुदखेड, उमरी, हदगाव, भोकर तालुक्यांत रविवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पावसादरम्यान अनेक भागात गारपीट झाल्याने रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. या दरम्यान मुदखेड तालुक्यात वीज पडून एका २२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

दरम्यान, उन्हाचा चटका वाढला असून, सोमवारी (ता. १२) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अशांच्या पार होते. किमान तापमानाचा पारा कमी अधिक होत असून, निफाड येथे थंडी कायम असून, राज्यातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात १० ते २३ अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. १३) राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.२ (१३.१), धुळे ३१.० (१०.३), जळगाव ३२.६ (१३.३), कोल्हापूर ३३.५ (१८.६), महाबळेश्वर २८.६ (१५.७), मालेगाव ३४.२ (१२.७), नाशिक ३२.४ (१२.७), निफाड ३२.० (८.२), सांगली ३४.६ (१८.३), सातारा ३४.२ (१५.०), सोलापूर ३६.४(२२.४), सांताक्रूझ ३२.२ (१७.१), डहाणू २९.३ (१६.८), रत्नागिरी ३१.७ (१७.३),

छत्रपती संभाजीनगर ३२.६ (१५.९), नांदेड - (२१.६), परभणी ३४.२ (१८.३), अकोला ३४.२ (१९.८), अमरावती ३१.८ (१८.५), बुलडाणा ३३.६ (१७.०), ब्रह्मपुरी ३१.२ (१९.०), चंद्रपूर ३१.२ (१८.६), गडचिरोली ३१.६ (१६.६), गोंदिया २८.९ (१७.२), नागपूर ३०.६(१९.४), वर्धा ३१.०(१९.०), वाशीम ३४.६ (१५.८), यवतमाळ ३३.० (१८.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT