High Weather Agrowon
हवामान

Weather Update : राज्यातील कमाल तापमानात वाढ; उकाडाही वाढला

Weather Forecast : देशातील काही भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती आहे. पण राज्यातील तापमानात मागील काही दिवसांपासून हळूहळू वाढ होत आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील काही भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती आहे. पण राज्यातील तापमानात मागील काही दिवसांपासून हळूहळू वाढ होत आहे. यापुढील काळातही किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. 

मागील दोन ते तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा अनेक ठिकाणी ३७ अंशांपार गेला. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. राज्यात सध्या उन्हाचा ताप आणि उकाड्यात वाढ झाली. दुपारी उन्हाचा चटका जास्तच जाणवत आहे.

किमान तापमानातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गारठा कमी होत आहे. राज्यात पुढील पाच दिवसही उन्हाची ताप वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या हवामानात वेगाने बदल असल्याने कधी उन्हाचा चटका, कधी गारठा, तर कधी अवकाळी पाऊस, गारपिट अशा हवामान घटनांना सामोरे जावे लागत आहे.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असल्याने, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढून घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. यातच उकाडा वाढल्याने घामटा निघत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Farmers Death : मराठवाड्यातील ५०१ पैकी २९७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण मदतीसाठी पात्र

Rohit Pawar On Farmers Issue: कृषिमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांचा हल्लाबोल; 'मिस्टर जॅकेट' म्हणत केली टीका

Kharif Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत १५ लाख ४३ हजार ३७२ हेक्टरवर पेरणी

Sustainable Farming : शाश्वत शेतीकडे वळणे गरजेचे

Mango Farming : मोहर येण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचे तंत्र

SCROLL FOR NEXT