Summer Heat Agrowon
हवामान

Weather Update : उन्हाचा चटका ; ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ

Team Agrowon

Weather Update Pune : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. मात्र तापमानाचा पारा सातत्याने चाळिशीपार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. यातच राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे.

आज (ता. १९) कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक स्थिती असल्याने सोमवारी (ता. २२) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अमरावती व वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४२.४ तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपुरी येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

तापमान चाळिशीपार असलेल्या भागात उन्हाचा चटका कायम आहे. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान होते. राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान झाले होते.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून मध्य प्रदेश, विदर्भ ते तेलंगणापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आज (ता. १९) राज्यात कमाल तापमानात चढ-उतार कायम राहणार असून, उष्ण व दमट हवामानामुळे चटका आणि उकाडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. विदर्भात पावसाला पोषक हवामान होत असून, सोमवारी (ता. २२) विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गुरुवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.५ (२३.४), जळगाव ४०.५, धुळे ४०, कोल्हापूर ३७.६ (२२.६), महाबळेश्‍वर ३२.९ (१९.२), नाशिक ३७ (२२.१),

निफाड ३८.६ (२३.८), सांगली ३९.२ (२२.९), सातारा ३९.४ (२२.२), सोलापूर ४०.७ (२६.२), सांताक्रूझ ३३.२ (२६.६), डहाणू ३४ (२७.४), रत्नागिरी ३४.६ (२६.५),

छत्रपती संभाजीनगर ३९.४ (२४.८), नांदेड ४०.२ (२७.२), परभणी ४०.२ (२५.३), अकोला ४१.८ (२८.१), अमरावती ४२.४ (२५.५), बुलडाणा ३७.८ (२७.६), ब्रह्मपुरी ४२.२ (२७),

चंद्रपूर ४१.८ (२६.४), गडचिरोली -(२५.६), गोंदिया ४१.५ (२५.८), नागपूर ४१.८ (२७.२), वर्धा ४२.४ (२८), यवतमाळ ४०.५ (२४.७).

मॉन्सून २४ तासांत अंदमानात
नैॡत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) अंदमानातील आगमनासाठी पोषक वातावरण होत आहे. उद्यापर्यंतच्या (ता. २०) २४ तासांमध्ये दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT