Administrative Action: कृषी विभागाचा आकृतिबंध रद्द करण्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा करूनही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संघर्ष कायम आहे. कृषी सचिव परिमल सिंह यांच्या बुधवारी (ता. १६) झालेल्या आढावा बैठकीस अमरावती विभागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुपस्थित तसेच असमाधानकारक कामकाज असलेल्या सुमारे २० अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत..आकृतिबंध रद्द करण्याच्या घोषणेनंतर शासनस्तरावर पुढील कार्यवाही सुरू असल्याचे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, शासकीय बैठकींना अनुपस्थित राहणे आणि नियमित कामकाज न करण्याच्या प्रकारांमुळे प्रशासन आणि महासंघातील संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे. कृषी आयुक्त मांढरे यांनी पुणे विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनाही बुधवारी पत्र दिले आहे. आकृतिबंध रद्द करण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू असली तरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय बैठकींना उपस्थित राहावे, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे आणि ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष शासकीय कामकाज नियमितपणे पार पाडावे, अशा सूचना देण्याचे निर्देश पत्राद्वारे त्यांनी दिले आहेत..Agriculture Department Restructuring: आकृतिबंधात सुधारणा करण्याचे आयुक्तांचे संकेत.अनुपस्थितांची स्वतंत्र नोंदशासकीय बैठकीस अनुपस्थित राहणे, ऑनलाइन कामकाज न करणे अथवा अन्य कारणांमुळे कामकाजापासून दूर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. अमरावती विभागातील असमाधानकारक कामकाज असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई सुरू करण्याबाबतचे प्रस्तावही मागविण्यात आले आहेत..महासंघाच्या भूमिकेकडे लक्षआकृतिबंध रद्द करण्याच्या घोषणेनंतर शासनाकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी बैठकीतील अनुपस्थिती आणि शासकीय कामकाजाच्या मुद्द्यावर कृषी आयुक्तालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे..Watershed Management: मजबूत प्रशासकीय अन् तांत्रिक समन्वयाची गरज.शेतकरी कामकाजाला प्राधान्यराज्यात हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तांत्रिक मार्गदर्शन, योजनांची अंमलबजावणी, पीक पाहणी, पंचनामे, विविध अहवालांचे काम नियमितपणे करणे अपेक्षित आहे. संघटनात्मक भूमिका आणि शासकीय कर्तव्य यामध्ये समन्वय राखून शेतकऱ्यांशी संबंधित कामकाज कोणत्याही परिस्थितीत बाधित होऊ नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे..महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघाकडून सामंजस्याची भूमिका घेतली असतानाही प्रशासनाकडून त्यास विपरीत पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे. प्रशासनाने अनावश्यकपणे ताठर भूमिका घेण्याऐवजी आमच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करणे अपेक्षित होते.- बाबासाहेब जेजुरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.