Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : गारपिटीनंतर उन्हाचा चटका अन् ढगाळ हवामान

Cloudy Weather : विदर्भ, मराठवाड्यात पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका आणि ढगाळ हवामान होत आहे.

अमोल कुटे

Pune News : विदर्भ, मराठवाड्यात पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका आणि ढगाळ हवामान होत आहे. उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज (ता. १४) राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. मंगळवारी (ता. १३) परभणी येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशांवर आहे.

किमान तापमानाचा पारा कमी अधिक होत आहे. निफाड येथे किमान तापमान ८.४ अंशांवर असल्याने थंडी आहे. तर उर्वरित राज्यात थंडी गायब झाली आहे. आज (ता. १४) तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.६ (१८.३), धुळे ३२.५ (११.४), जळगाव ३३.७ (१३.४), कोल्हापूर ३३.८ (१८.३), महाबळेश्वर २८.८ (१५.८), मालेगाव - (१४.४), नाशिक ३१.४ (१३.१), निफाड ३१.४ (८.४), सांगली ३४.७ (१८.३), सातारा ३४.२ (१५.०), सोलापूर - (२१.४), सांताक्रूझ ३२.८ (१७.५), डहाणू ३०.४ (१७.५), रत्नागिरी ३२.९ (१७.६),

छत्रपती संभाजीनगर ३२.१ (१६.८), नांदेड ३३.८ (२०.६), परभणी ३५.० (२०.०), अकोला ३३.८ (१९.०), अमरावती ३१.२ (१८.७), बुलडाणा ३२.६ (१८.०), ब्रह्मपुरी ३३.२ (१८.६), चंद्रपूर ३१.० (१७.८), गडचिरोली ३०.२ (१६.८), गोंदिया २९.९ (१८.२), नागपूर ३०.०(१८.८), वर्धा ३०.०(१८.९), वाशीम ३४.६ (१७.८), यवतमाळ ३३.२ (१९.०).

मराठवाड्यावर चक्राकार वारे

उत्तर भारतात थंडी कमी झाली असून, पंजाबच्या अमृतसर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर पावसाला पोषक हवामान असल्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार व झारखंडमध्ये वादळी पाऊस गारपिटीची शक्यता आहे. यातच मराठवाड्यात समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT