Weather Update Agrowon
हवामान

Weather Report : उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तापमानाचा पारा १४ अंशांच्या खाली घसरला

Weather Update : आज (ता. १८) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

IMD Alert : उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम असतानाच, मध्य महाराष्ट्र विदर्भातही तापमानाचा पारा खाली आला आहे. राज्याच्या कमाल तापमानातही घट होत आहे. आज (ता. १८) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

श्रीलंके जवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, त्यापासून बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच असून, कोकणात कमाल तापमानाचा पारा खाली आला आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३५.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा २९ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा पुन्हा १४ अंशांच्या खाली घसरला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, पुणे,  जळगाव, यवतमाळ, गोंदिया, वाशीम येथे पारा १५ अंशाच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात 'मिधिली' चक्रीवादळ

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने बंगालच्या उपसागरात 'मिधिली' चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळाचे केंद्र ओडिशाच्या परादीपपासून २५० किलोमीटर ईशान्येकडे, पश्चिम बंगालच्या दिघा बेटापासून आग्नेयेला १८० किलोमीटर, तर बांग्लादेशाच्या खेपूपापासून १८० किलोमीटर नैर्ऋत्येला होते. शुक्रवारी (ता. १७) रात्री उशीरा पर्यंत हे चक्रीवादळ खेपूपारालगत बांग्लादेशाच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता असून, आज (ता.१८) चक्रीवादळाची तीव्रता ओसरणार आहे.  

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३०.६ (१४.४), जळगाव ३२.२ (१४.८), कोल्हापूर २९.८ (१८.२), महाबळेश्वर २५.६ (१४.९), नाशिक ३०.७ (१४.१), निफाड ३०.२ (१२.५), सांगली ३०.० (१७.५), सातारा ३१.१ (१५.३), सोलापूर ३३.०(१८.६), सांताक्रूझ ३५.२ (२१.६), डहाणू ३५.३ (२०.५), रत्नागिरी ३५.१ (२१.०), छत्रपती संभाजीनगर ३१.४ (१३.२), नांदेड ३०.४ (१७.०), परभणी ३०.५ (१६.१), अकोला ३२.६ (१७.५), अमरावती ३१.८ (१७.५), बुलढाणा ३०.५ (१६.५), ब्रह्मपूरी ३२.२ (१७.१), चंद्रपूर ३०.२(१६.२), गडचिरोली ३१.२ (१६.०), गोंदिया २९.८ (१४.५), नागपूर ३०.५(१५.२), वर्धा ३०.०(१६.५), वाशीम ३३.४(१४.६), यवतमाळ ३०.५ (१४.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women International Year 2026: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष केवळ उत्सव की खरी मान्यता?

Interview with Dr Sanjay Kolte: साखर उद्योग बळकट करण्यासाठी प्रयत्न

Duck Farming: येरुकला : बदकपालन करणारा भटका समाज

Rural Employment: ऊस पाचटापासून मूल्यवर्धनासह रोजगार निर्मिती

Women Enterpreneurship: शेतमजूर ते प्रक्रिया उद्योजिकेपर्यंतचा प्रवास

SCROLL FOR NEXT