Monsoon Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : मराठवाड्यात ३ दिवस उघडीप राहणार; विदर्भात बुधवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Rain Update : हवामान विभागाने पुढील ४ दिवस काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर अनेक ठिकाणी पाऊस उसंती घेण्याची शक्यता व्यक्त केली.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या बहुतांशी भागात तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पावसाने उसंती घेतल्याची स्थिती होती. अनेक भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडल्या. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होता. हवामान विभागाने पुढील ४ दिवस काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर अनेक ठिकाणी पाऊस उसंती घेण्याची शक्यता व्यक्त केली. 

हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडी, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. कोल्हापूर, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. 

उद्याही कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात उद्या पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. 

बुधवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बुधवार, गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही या तीन दिवसांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

मराठवाड्याच्या काही भागात गुरुवारपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT