Weather Prediction : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता.२५,२६) ‘ला-निना’चे वाढ हवेचे दाब उत्तरेस १००२ व मध्यावर १००४ हेप्टापास्कल, तर मंगळवार ते गुरुवार (ता.२७, २९) या दरम्यान १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके राहतील. शुक्रवारी आणि शनिवारी (ता.३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर) हवेचे दाब उत्तरेस पुन्हा १००२ ते १००४ व दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल इतके कमी राहण्यामुळे राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होईल.
उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईमध्येही जोरदार पावसाची शक्यता राहील. तुलनेने मराठवाड्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. पश्चिम विदर्भासह मध्य विदर्भातील यवतमाळ, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील पुणे येथे काही दिवशी मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्याच्या वेगातही काही दिवशी वाढ होईल.
विशेष करून नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत वारे ताशी ३० कि.मी. वेगाने वाहतील. आकाश पूर्णतः ढगाळ राहणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के किंवा त्याहून अधिक राहण्यामुळे पावसाच्या वितरणाचा वेग वाढेल.
‘ला-निना’चा प्रभाव वाढत असल्याने पावसाच्या प्रमाणात वाढ होणे शक्य आहे. प्रशांत महासागराचे पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान इक्वाडोरजवळ २२, तर पेरूजवळ १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून तिकडे हवेचे दाब वाढतील. त्यामुळे अरबी समुद्र, हिंदी महासागरावरील वारे नैऋत्य दिशेने भारताचे भूपृष्ठाच्या दिशेने येत आहेत. गुजरातजवळ गुरुवारी (ता. २९) लहान चक्रीय वादळाची निर्मिती होईल.
कोकण
आज आणि उद्या (ता.२५,२६) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० ते ४२ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ३८ ते ७२ मि.मी., रायगड जिल्ह्यात ६८ ते ७४ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ६६ ते ८२ मि.मी. व पालघर जिल्ह्यात ४२ ते ९८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. वारे ताशी १८ ते २४ कि.मी. वेगाने वाहतील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८६ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज आणि उद्या (ता.२५,२६) नाशिक जिल्ह्यात १४ ते ४७ मि.मी., धुळे जिल्ह्यात १२ ते ३६ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात १७ ते २२ मि.मी., जळगाव जिल्ह्यात १७ ते ३४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग जळगाव जिल्ह्यात २२ कि.मी., तर नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ताशी ३२ कि.मी. राहील. कमाल तापमान धुळे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस आणि धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के राहील.
मराठवाडा
मराठवाड्यात पावसाचे प्रमाण मध्यम राहील. आज आणि उद्या (ता.२५,२६) धाराशिव जिल्ह्यात ४ ते १३ मि.मी., लातूर जिल्ह्यात ३ ते १८ मि.मी., नांदेड जिल्ह्यात १९ ते २२ मि.मी., बीड जिल्ह्यात १२ ते २२ मि.मी., परभणी जिल्ह्यात १३ ते २३ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात १६ ते २२ मि.मी, जालना जिल्ह्यात १७ ते २७ मि.मी., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ ते २४ मि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेगात वाढ होईल. नांदेड व परभणी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २२ कि.मी., हिंगोली
जिल्ह्यात २१ कि.मी., तर लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी २८ कि.मी. राहील. जालना जिल्ह्यात ताशी वेग २६ कि.मी., तर धाराशिव जिल्ह्यात २९ कि.मी. आणि बीड जिल्ह्यात ३० कि.मी. राहील. कमाल तापमान धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर बीड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि जालना जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८२ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज आणि उद्या (ता.२५,२६) बुलडाणा जिल्ह्यात १३ ते ४१ मि.मी. अकोला जिल्ह्यात १० ते ५६ मि.मी., वाशीम जिल्ह्यात १७ ते ३७ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात १२ ते ४७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २२ ते २५ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४ टक्के इतकी अधिक राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९२ टक्के राहील.
मध्य विदर्भ
आज आणि उद्या (ता.२५,२६) यवतमाळ जिल्ह्यात १७ ते ५४ मि.मी., वर्धा जिल्ह्यात ७ ते २१ मि.मी., नागपूर जिल्ह्यात ९ ते १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २३ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ९३ टक्के, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ९१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ९० टक्के राहील.
पूर्व विदर्भ
आज आणि उद्या (ता.२५,२६) चंद्रपूर जिल्ह्यात १३ ते ४१ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात १७ ते ६७ मि.मी., भंडारा जिल्ह्यात १४ ते २९ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात २० ते ४० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली जिल्ह्यात ११ कि.मी., गोंदिया जिल्ह्यात १५ कि.मी., चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात १८ ते १९ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज आणि उद्या (ता.२५,२६) कोल्हापूर जिल्ह्यात ८ ते १८ मि.मी., सांगली जिल्ह्यात ४ ते १० मि.मी., सातारा जिल्ह्यात १३ ते १८ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ४ ते ९ मि.मी., पुणे जिल्ह्यात २१ ते ५४ मि.मी. व नगर जिल्ह्यात २१ ते ३१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली व नगर जिल्ह्यांत ३१ कि.मी., सोलापूर जिल्ह्यात २९ कि.मी., पुणे जिल्ह्यात २७ कि.मी., सातारा जिल्ह्यात २५ कि.मी. व कोल्हापूर जिल्ह्यात २१ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, सांगली व पुणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, सोलापूर व नगर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील.
कृषी सल्ला :
- खरीप पिकांच्या लागवडीमधून तसेच फळबागेतून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
- नागली, वरी लागवडीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी बेणणी करावी.
- भुईमूग लागवडीमध्ये शिफारशीपेक्षा अधिक प्रमाणात नत्राचा वापर टाळावा.
- उभ्या पिकांतील मोठी उंच वाढलेले तणे उपटून टाकावीत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.