Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : मराठवाडा, विदर्भात पाऊस उघडीप देणार; आज आणि उद्या राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update : मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात मागील ४ दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पण मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

तर मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. खानदेशातही येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. 

उद्यापासून मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मात्र जोरदार पावसाची शक्यता नाही. 

शुक्रवारपासून विदर्भातही पाऊस उघडीप देण्यात शक्यता आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर म्हणजेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील. विदर्भात मात्र पुढचे तीनही दिवस पावसाची उघडीर राहू शकते, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT