Agriculture Weather Agrowon
हवामान

Weather Forecast : हवामान बदलाचा थंडीच्या तीव्रतेवर परिणाम

 डॉ. रामचंद्र साबळे 

Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ हेप्टापास्कल इतका मध्यम स्वरूपाचा हवेचा दाब राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत कमाल व किमान तापमानात वाढ होईल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील.

धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत आकाशात ढगांचे प्रमाण अधिक राहणे शक्य आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत व पश्‍चिम महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक राहणे शक्य असल्याने त्याचा परिणाम थंडीवर होईल. थंडीचे प्रमाण सौम्य राहील.

‘एल निनो’चा प्रभाव या हंगामातील हिवाळ्यावर झाला आहे. अरबी समुद्र, हिंदी महासागर, प्रशांत महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस इतके समान आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून असल्याने वायव्येकडून, उत्तरेकडून व ईशान्येकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्याचाही परिणाम थंडीवर होत असल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट झाली आहे. यापुढील काळातही सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील. त्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील. अशा प्रकारच्या हवामानामुळे गहू पिकाच्या वाढीच्या अवस्था कमी दिवसांत पूर्ण होतात. त्यामुळे गहू पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता राहील.

कोकण

कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५२ टक्के, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४० ते ४९ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ टक्के, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ ते २५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, नंदुरबार जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.

धुळे व जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. त्याचा परिणाम थंडीवर होईल.

मराठवाडा

धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर जिल्ह्यात ७२ टक्के, तर धाराशिव, नांदेड, बीड या जिल्ह्यांत ६१ ते ६२ टक्के राहील. परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यांत ३० ते ३३ टक्के, तर धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत २६ ते २९ टक्के राहील. दुपारी हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे.

मध्य विदर्भ

कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात २७ टक्के, नागपूर जिल्ह्यात २९ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ६५ टक्के, तर गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ५३ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २२ ते ३२ टक्के राहील. त्यामुळे दुपारी हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील.

तर सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५१ टक्के, तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत ६० ते ६३ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २१ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली जिल्ह्यात १४ कि.मी., तर सोलापूर जिल्ह्यात ताशी १५ कि.मी. राहील. सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ कि.मी. राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला

किमान तापमानाचा पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी भाजीपाला पिके, रोपवाटिका तसेच बागायती पिकांना संध्याकाळी पाणी द्यावे.

आंबा मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी.

गव्हाच्या पिकास वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे.

हरभरा पिकास फुलोरा अवस्थेत व घाटे भरण्याच्या अवस्थेत सिंचन करावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT