Rainy Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात हवामान कसे राहील? देशातील काही भागात पावसाची हजेरी

Weather Update : काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर पुढील पाच दिवस राज्यात कोरडे हवामान राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : देशातील काही भागात थंडीचा कडाका कायम आहे तर काही ठिकाणी पावसाची स्थिती आहे. महाराष्ट्रातही विदर्भातील काही ठिकाणी दोन दिवस पाऊस आणि ढगाळ वातावरण होते. 

उत्तर भारतातील अनेक भागात थंडीचा काडाका कायम आहे. उत्तर भारतातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान ७ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर अनेक ठिकाणीचे तापमान सरासरीपेक्षा जास्तच होते.

आज पंजाबमधील अमृतसर येथे देशातील सर्वात कमी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली आणि ओडिशाच्या काही भागात सकाळी धुक्याची चादर दिसून आली होती. 

पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागात पाऊस झाला. तर हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या.

तर राज्यात आज सकाळी अनेक ठिकाणी गारवा काहीसा वाढला होता. तर विदर्भातील पावसाची स्थिती निवळल्याचे दिसते. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर पुढील पाच दिवस राज्यात कोरडे हवामान राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Cultivation: गडहिंग्लजमध्ये भात पुनर्लागण खोळंबली

Rainfall Deficit Maharashtra: जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत नंदुरबार; पेरण्या अजूनही संथ

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेच्या निकषात अंशत: बदल, सुधारित शासन निर्णय जारी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात स्थिरता; मका बाजारात चढ-उतार, कोबी दरात चढ-उतार, डाळिंब आवकेत घट तर मेथी भाजीच्या दरात चढ-उतार

Fertilizer Shortage: खानदेशात ‘डीएपी’ची टंचाई कायम

SCROLL FOR NEXT