Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave In Maharashtra : राज्यात पुढील पाच दिवस हवामान कसं राहणार? 

Weather Update : पुढील दोन दिवस सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Dhananjay Sanap

Pune News : हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केलाय. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे.

तसेच पुढील पाच दिवसात राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. तर राज्यातील उन्हाचा पारा ४१ अंश सेल्सियसवर पोहचला. तर काही भागात ढगाळ हवामान झालं आहे.

मागील २४ तासात सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तर ४ आणि ५ एप्रिल रोजी काही भागात हलक्या पावसासह अकोला, चंद्रपुर आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

देशभरात मागील २४ तासात कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशावर होता. रायलसीमाच्या काही भागात आणि पश्चिम मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेशची किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ झाली. पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटांसह काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकरी संघटनांकडून संघर्ष समितीची स्थापना; शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन जाहीर

Delhi Kisan Mahapanchayat: दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकऱ्यांची महापंचायत; हमीभाव,अमेरिकेसोबतचा करार हे मुद्दे चर्चेत

Sugarcane SAP : शेतकऱ्यांची लूट थांबवा; उत्पादन खर्च आधारित ‘एसएपी’ सुरू करा

Soybean Market: सोयाबीन बाजारात चिंता; अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी चीनने थांबवली

Crop Damage Survey : महापुराचे पाणी शिरलेल्या सर्व शेतीचे पंचनामे करा

SCROLL FOR NEXT