Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : पुढील ५ दिवस पाऊस कसा राहील? विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

Weather Update : आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज दिला. तर गुरुवापासून पाऊस काहीसा कमी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक ठिकाणी मागील २ दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. आज सकाळपासूनच बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत होता. हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज दिला. तर गुरुवापासून पाऊस काहीसा कमी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

कोकणातही आजही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला काही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. यासोबतच संपूर्ण विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

उद्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असला तर कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

गुरुवारपासून राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असला तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.  

राज्यातील अनेक भागात मागील २ दिवसांमध्ये चांगला पाऊस पडला. विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यात तब्बल २८ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. कोकणालाही पावसाने चांगलेच झोडपले. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्येही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार सरी बरसल्या. नगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावत सात महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Smart Farming: स्मार्ट शेती : गरज, तंत्रज्ञान आणि भविष्य

Bhusar Market Closure: मार्केट यार्डातील भुसार बाजार २५ फेब्रुवारीला राहणार बंद

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

SCROLL FOR NEXT