Rain Update  Agrowon
हवामान

Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाचा अंदाज

Konkan Monsoon Rain : मॉन्सून सक्रिय असल्याने पावसाला सुरवात झाली असली तरी राज्यात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर दमदार सरी कोसळत आहेत. धरणांच्या पाणलोटातही पावसाची रिपरिप सुरू आहे.

Team Agrowon

Weather Update : पुणे : मॉन्सून सक्रिय असल्याने पावसाला सुरवात झाली असली तरी राज्यात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर दमदार सरी कोसळत आहेत. धरणांच्या पाणलोटातही पावसाची रिपरिप सुरू आहे.

आज (ता. ३०) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

उत्तर मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

वायव्य राजस्थानपासून कमी दाबाचे क्षेत्र झारखंड, पश्चिम बंगाल ते नागालॅण्डपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम विस्तारले आहे.

गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे कायम आहेत. महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आज (ता. ३०) कोकणात पावसाचा जोर कायम राहील. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.

मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह नाशिक, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशाचा बहुतांश भाग व्यापला
देशात मॉन्सूनची प्रगती सुरू आहे. देशाचा बहुतांशी भाग त्याने व्यापला आहे. बुधवारी (ता. २८) संपूर्ण अरबी समुद्र राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली होती.

पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत हरियाना, पंजाबसह राजस्थानच्या उर्वरित भागासह संपूर्ण देशभरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, रायगड, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT