Monsoon Update Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon 2023 : पूर्व विदर्भात अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरींचा अंदाज

Maharashtra Orange Alert : हवामान विभागाने आज आणि उद्या दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही दिला.

Swapnil Shinde

IMD Rainfall Alert : राज्याच्या काही भागांमध्ये आजपासून पावसाच्या सरी पडल्या. पण हवामान विभागाने अंदाज देऊनही काही ठिकाणी पावसाची उघडीप कायम आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही दिला.

हवामान विभागाने आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.

या पाच जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट दिला. तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमवरावती, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोर पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, जालना आणि खानदेशातील जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

उद्याही राज्याच्या बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भ, मराठवड्याला विजांसह काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि सोलापूर तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

राज्याच्या इतर भागातही हलक्या ते मध्यम सरी होतील. तर काही ठिकाणी जोरदार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

आता माॅन्सूनची स्थिती काय आहे ते पाहू… माॅन्सूनचा आस असेलला कमी दब पट्ट्याचे पूर्वेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याशीच आहे. हा पट्टा सध्या गोरखपूर, डेहरी, रांची, बालासोरपर्यंत विस्तारला आहे.

बंगाल उपसागराच्या वायव्येला आणि शेजारच्या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे कमी दाब क्षेत्र पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी भागापर्यंत विस्तारले आहे. समुद्रसपाटीपासून हे कमी दाब क्षेत्र ७.६ किलोमीटर उंचीवर असून दक्षिणेकडे झुकलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Import Policy: आत्मनिर्भरतेला वाटाण्याच्या अक्षता

Fake Fertilizers: वर्षभरात आठ कोटींच्या संशयास्पद निविष्ठा जप्त

River Conservation: ...और कारवाँ बनता गया

Pre Monsoon Rain: पूर्वमोसमी पावसाचा रुद्रावतार कायम

Cotton Market: आगामी हंगाम कापसास पोषक?

SCROLL FOR NEXT