Rain Agrowon
हवामान

Rain Alert : बुलडाणा, खानदेशात पावसाच्या जोरदार सरी

Rain Update : राज्यातील काही ठिकाणी मॉन्सूनोत्तर जोरदार पाऊस पडत आहे. ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बुलडाणा जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

Team Agrowon

Pune News : राज्यातील काही ठिकाणी मॉन्सूनोत्तर जोरदार पाऊस पडत आहे. ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बुलडाणा जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सोमवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील जांभूळधाबा येथे १६६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे पिके काढणीच्या कामात अडथळे येत आहे.  

कोकणातील ठाणे जिल्ह्यातील दहिसर, बेलापूर, कल्याण, टिटवाळा येथे जोरदार पाऊस पडला. तर रायगडमधील खारवली येथे ६३ मिलिमीटर, तर रोहा, नागठाणे, कोलाड, मेंढा येथे मध्यम सरी पडल्या. पालघरमधील विरार येथे ८२ मिलिमीटर, तर अगाशी ७६, माणिकपूर ६४ मिलिमीटर, वसई, मांडवी, निर्मल येथे जोरदार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटांसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील भातपीक कापणी रखडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाऊस थांबणार कधी आणि भातपिकाची कापणी करायची कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सोमवारी (ता. १४) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ऑक्टोबर हिटचा चटका कायम असला तरी पावसाचा जोरदेखील आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पावसाच्या सरी सुरू आहेत.

रविवारी सकाळपासून जिल्ह्यात कडक ऊन होते. परंतु दुपारी बारापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. त्यानंतर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरू होत्या.

खानदेशातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. नंदुरबारमधील चिंचपाडा येथे ८५ मिलिमीटर, तर विसरवाडी, खांडबारा येथे ७२ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे शेतीकामामध्ये व्यत्यय येत असून शेतकऱ्यांची धावपळ उडाली. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही चांगला पाऊस पडला.

जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथे ७१ मिलिमीटर, तर नामपूर ४२, जयखेडा ६२, विरगाव ५०, डांगसौदाणे ६५, मुल्हेर ५७, ताहराबाद ३९, मोखबांगी ७४, नंदगाव ९२, रानवद ६७, लासलगाव ६३, विचूर, देवगाव ८३ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला.

या जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी झाली. तर बीड, जालना जिल्ह्यांतील काही मंडलांचा अपवाद वगळता बहुतांश मंडलांत तुरळक हलका ते  मध्यम पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर असलेल्या आनंदावर विरजण पडले. सोयाबीनचे या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मलकापूर, नांदुरा तालुक्यांत अतिवृष्टी, वादळी पावसाने हाहाकार उडवला. बुलडाणा, खामगाव, चिखली या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात मागील चार दिवसांत बऱ्याच भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. प्रामुख्याने मलकापूर तालुक्यात मागील २४ तासांत अतिवृष्टी झाली असून, ११७ मिलिमीटर एवढी विक्रमी पावसाची यंदाची सर्वाधिक नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT