Pre Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain Update: विदर्भात मुसळधारेचा अंदाज; राज्यात काही भागात पावसासाठी पोषक हवामान

Weather Forecast: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांत माॅन्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. तर राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांत माॅन्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. तर राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सूनने आजही प्रगती केली नाही. माॅन्सूनची अरबी समुद्रातील शाखा १६ दिवसांपासून एकाच भागात आहे. तर बंगालच्या उपसागरातील शाखा १४ दिवसांपासून एकाच ठिकाणी आहे. माॅन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट परिसरात आहे.

आता माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होत आहे. त्यामुळे माॅन्सूनची वाटचाल पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. माॅन्सून १४ जूनपर्यंत मध्य भारतात आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला. विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर शुक्रवारपासून कोकणातही पाऊस वाढेल. विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागूपर आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. शनिवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही पुढील ५ दिवस काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; राजीनाम्याच्या मागणीला जोर

Khandesh Water Storage : भूगर्भातील पाणी उपसा घटला

Watermelon Farming : खरिपातील कलिंगडाची लागवड यंदा कमीच

MSP committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हमीभाव समितीच्या नियमित बैठका; केंद्रीय कृषिमंत्र्यांचे उत्तर

Agrowon Podcast: पपईच्या दरात सुधारणा; कारली-मका तेजीत, कोथिंबीर स्थिर, तर तूर मात्र मंदीत

SCROLL FOR NEXT