Monsoon Rain  Agrowon
हवामान

Marathwada Rain Alert : मराठवाड्यात उद्यापर्यंत मुसळधारेचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाचा अंदाज कायम

Marathwada Rain Forecast : हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर दोन दिवसांनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. तर हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर दोन दिवसांनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर छत्रपती संभाजीगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट देण्यात आला. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

विदर्भातील अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आणि उरलेल्या ९ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) हवामान विभागाने दिला. तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.


उद्या म्हणजेच मंगळवारी आणि बुधवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर उद्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी तसेच खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

बुधवारपासूनमात्र मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

गुरुवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT