Rain Agrowon
हवामान

Konkan Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा

Konkan Rain Prediction : मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार जलघारा कोसळत आहेत.

Team Agrowon

Konkan Weather Update : मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार जलघारा कोसळत आहेत. आज (ता. २१) कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा आहे.

पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट' तर मुंबई, रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाला असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, गुणा, रायपूर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

महाराष्ट्राच्या मध्य भागातून असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा दणका सुरूच असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यातही हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता. २१) कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा आहे.

पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट' तर मुंबई, रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर सिंधूदुर्ग, नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट), उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

अति जोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

मुंबई, रत्नागिरी, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT