Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस हवामानाचा अंदाज काय ? 

Rain Alert : आज राज्यातील कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यातील काही भागात हजेरी लावणार पाऊस गुरुवारपासून म्हणजेच उद्यापासून उघडीप देण्याची शक्यता आहे. तसेच आज राज्यातील कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.आज राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे, कोल्हापुर, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

तसेच नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली. गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळं शेती पिकांचं नुकसान झालं.

राज्यातील पावसाचा जोर ओसरला गुरुवारपासून ओसरणार आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT