Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Monsoon Rain Update : पूर्व किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भासह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : पूर्व किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भासह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २८) कोकण, घाटमाथा, आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, दुर्ग, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेल्या मॉन्सूनचा आस उत्तरेकडे जाण्याचे संकेत आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. २८)ठाणे, रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर उर्वरित विदर्भ, कोकण, कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

कमी दाबाचे क्षेत्र निवळतेय

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ठळक कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता कमी होऊ लागली आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, गोंदिया, भंडारा.

जोरदार पाऊस / विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT