Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Forecast : उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य मध्य प्रदेशात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय असून, ही प्रणाली राजस्थान आणि गुजरातकडे सरकताना आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे रविवारी (ता. २५) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, पश्‍चिम बंगाल, ओडिशाकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, कमी दाबाचे केंद्र, सिधी, चैबासा, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार कायम आहे.

रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३३ अंश तापमानाची नोंद झाली. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली घसरला आहे. राज्यातील उकाडा कमी झाला असून, हवेच गारठा जाणवू लागला आहे. कोकण, घाटमाथ्यासह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २६) कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार सरींचा अंदाज आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, पालघर, धुळे, जळगाव.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT