Lightning Agrowon
हवामान

Konkan Rain News : पूर्व विदर्भ, तळ कोकणात जोरदार पावसाचा इशारा

Konkan Latest Rain Update : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

Team Agrowon

Maharashtra Monsoon 2023 Update: पुणे : विदर्भासह राज्याच्या विविध भागांत हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. आज (ता. १३) पूर्व विदर्भ आणि तळ कोकणात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्‍चिम भाग दक्षिणेकडे कायम असून, पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीत आहे. मॉन्सूनचा (Monsoon) आस राजस्थानच्या बिकानेर, ग्वालेर, सिधी, गया, बालुरघाट ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय आहे.

पश्‍चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर, तर दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

कोकण, घाटमाथ्यावर पाऊस ओसरला असून, विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. १३) तळ कोकणातील सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

आज (ता. १३) राज्यातील पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना. बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT