Rain Forecast Agrowon
हवामान

Vidarbha Rain Forecast : पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Vidarbha Rain Update : बंगालच्या उपसागरातील पोषक प्रणालींमुळे विदर्भात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.

Team Agrowon

Pune News : पावसाने उघडीप दिल्याने राज्यात ढगाळ हवामानासह ऊन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरातील पोषक प्रणालींमुळे विदर्भात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.

आज (ता. १३) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस जैसलमेर, शिवपूरी, रांची, दिघा ते पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. नैऋत्य उत्तर प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

त्यापासून बांगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्यात पावसाच्या उघडिपीने उन्हाचा चटका वाढला आहे. ढगाळ हवामानासह उकाड्यामुळे घामटा निघत आहे. आज (ता. १३) पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे.

उर्वरित विदर्भात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राची होतेय निर्मिती

मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. काहीशा दक्षिणेकडे झुकलेल्या या प्रणालीमुळे आज (ता. १३) वायव्य आणि पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली आणखी तीव्र होत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT