Weather agrowon
हवामान

Weather Upadate : विदर्भात आज वादळी पावसाचा इशारा

उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार

Team Agrowon

Pune Weather News: राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने कमाल तापमान (Maximum Temprature) ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. आज (ता. ३०) विदर्भात तुरळक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळी उकाड्यातही वाढ झाली आहे. बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

वर्धा येथे ३९ अंश, सोलापूर, अमरावती, चंद्रपूर येथे कमाल तापमान ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून, बहुतांश ठिकाणी पारा १५ ते २४ अंशांच्या दरम्यान आहे.

उत्तर मध्य प्रदेशपासून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ३०) विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा असून, तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :


पुणे ३६.० (१७.७), नगर ३५.३ (१६.४), जळगाव ३६.८ (१९.७), धुळे ३६.० (१५.६), कोल्हापूर ३५.६ (१८.१), महाबळेश्वर ३०.१ (१६.७), नाशिक ३३.८ (१७.०), निफाड ३४.४(१३.२), सांगली ३५.८ (१७.१), सातारा ३५.८ (१६.०), सोलापूर ३८.७(२०.१), सांताक्रूझ ३२.० (२२.०), डहाणू ३२.४ (२१.३), रत्नागिरी ३२.९ (१९.५), छत्रपती संभाजीनगर ३४.४ (१८.२), नांदेड - (२१.६), परभणी ३७.३ (२०.४), अकोला ३७.९ (१९.८), अमरावती ३८.२(१९.१), बुलडाणा ३५.४ (२१.६), ब्रह्मपुरी ३९.२ (२२.८), चंद्रपूर ३८.६ (२३.४), गडचिरोली ३५.६(२०.६), गोंदिया ३६.५ (२०.६), नागपूर ३७.२ (२०.०), वर्धा ३९.०(२०.०), वाशीम ३६.६ (२१.८), यवतमाळ ३७.५ (२१.७).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
विदर्भ : अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT