Weather Report  Agrowon
हवामान

Rain In Maharashtra : राज्यातील १९ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा; पाऊस कधी उघडणार?

Weather Report : आज हवामान विभागाने राज्यातील १९ जिल्ह्यांना काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

Dhananjay Sanap

IMD Report : राज्यात मागील आठवडाभरापासून विविध भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे थंडी गायब झाली. गुरुवारी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान होते. आज हवामान विभागाने राज्यातील १९ जिल्ह्यांना काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, तसेच सातारा आणि सांगली तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, विजा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम, यवतमाळ

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, कमाल तापमानातील घट, किमान तापमानातील वाढ कायम आहे. राज्यात रविवारपासून पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून गारवा परतण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश भागात पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर रब्बी पिकांना दिलासाही मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT