Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार शक्य

Monsoon Rain : अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह बळकट होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर वाष्प किनाऱ्याकडे येत आहे.

अमोल कुटे

Pune News : अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह बळकट होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर वाष्प किनाऱ्याकडे येत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज (ता. २५) कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुण्यातील चिंचवड येथे राज्यातील उच्चांकी १२० मिलीमीटर पावसाची नोंद होत अतिमुसळधार पाऊस झाला. तर रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथे ११० मिलीमीटर तर चिपळूण येथे ८० मिलीमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. उर्वरित कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी होता. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.

दक्षिण गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून झारखंड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

सोमवारी (ता. २४) बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नाशिक, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान होते. पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली, तरी उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र कायम आहे.

मॉन्सूनने संपूर्ण राज्य व्यापले असून, अरबी समुद्रातून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर आज (ता. २५) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उत्तर कोकणात जोरदार, तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :

हर्णे ११०, चिपळूण ८०, रत्नागिरी, खेड, दापोली, खालापूर प्रत्येकी, लांजा, संगमेश्वर प्रत्येकी ४०, सावर्डे, वाडा, माथेरान, कर्जत प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :

चिंचवड १२०, बार्शी ६०, जळगाव, त्र्यंबकेश्वर, साक्री, गिधाडे, सिन्नर प्रत्येकी ५०, इगतपुरी, सोलापूर, ओझरखेडा, हर्सूल, सटाना, बागलाण प्रत्येकी ४०, तळोदा, शिरपूर, नंदूरबार, वाई, वणी, सिंदखेडा, भुसावळस, नेवासा, शिरूर प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

रेणापूर ८०, लोहा ५०, औसा, सिल्लोड, आष्टी, लोहारा, धर्माबाद, भोकर प्रत्येकी ४० उमरगा ३०, देवणी, कंधार, अर्धापूर, पालम, माजलगाव, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पाटोदा प्रत्येकी २०.

विदर्भ :

मौदा, मोहाडी प्रत्येकी ५०, आष्टी, जेवती, तुमसर प्रत्येकी ४०, राजूरा, महागाव, करंजलाड, घाटंजी, अर्णी, पुसद प्रत्येकी ३०, तिवसा, चिखलदरा, चांदूररेल्वे, वाशीम, चिखली, कोर्ची, रिसोड, लोणार, नांदगावकाझी, अहिरी प्रत्येकी २०.

घाटमाथा :

भिवपूरी, कोयना प्रत्येकी ६०, भिरा, डुंगुरवाडी कोयना प्रत्येकी ४०.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: मुरासू चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज; तीन दिवस कोणत्या भागात पाऊस पडणार?

Rabi Sowing: पाण्याची उपलब्धता असल्यास हरभरा, करडई, ज्वारीची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत शक्य

Farm Loan Waiver: कर्जमुक्तीस पात्र-लाभार्थींमध्ये अजूनही मोठी तफावत

Vineyard Management: दुष्काळाचे द्राक्ष बागेवरील संभाव्य परिणाम आणि उपाययोजना

Lek Ladki Yojana: 'लेक लाडकी' योजनेच्या नियमात बदल; आता 'महाडीबीटी'वरुन थेट ऑनलाईन अर्ज करा, आदिती तटकरेंची माहिती

SCROLL FOR NEXT