Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Monsoon Rain Update: मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. २७) कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. २७) कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. रायगडसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर छत्तीसगड आणि झारखंड परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली मध्य प्रदेशाकडे येताना हळूहळू निवळून जाण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अनुपगड, चुरू, ग्वाल्हेर, रेवा, तीव्र कमी दाबाचे केंद्र, पुरुलिया, ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढला होता. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, कोकण, घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. शनिवारी (ता. २७) सकाळपासूनच राज्यात सर्वदूर पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी सुरू होत्या. कमाल तापमानात घट झाल्याने बहुतांश ठिकाणी पारा ३० अंशांच्या खाली आला असला तरी, जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३१.८अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २७) रायगड, पुण्याचा घाटमाथा, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरींची, तसेच वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२५.९---२२.२

अहिल्यानगर---निरंक---२१.२

‎‎धुळे---२९.०---२१.३

जळगाव---३१.८---२३.७

जेऊर---२८.५---२०.०

‎‎कोल्हापूर---२५.२---२२.०

‎महाबळेश्‍वर---१९.१---१७.८

मालेगाव---२८.४---२१.२

‎‎नाशिक---२४.७---२२.६

‎निफाड---३०.०----२२.८

‎सांगली---२६.५---२२.०

‎सातारा---२६.०---२२.०

‎सोलापूर---२९.४---२२.६

‎सांताक्रूझ---२६.९---२५.१

डहाणू---२८.२---२४.९

‎रत्नागिरी---३०.१---२४.४

‎छत्रपती संभाजीनगर---२६.८---२२.६

‎धाराशिव---२५.०---१९.९

‎परभणी---२६.५---२३.०

परभणी (कृषी)---२५.७---२२.३

‎‎अकोला---२९.३---२४.२

अमरावती---२७.२---२२.२

भंडारा---२७.०---२२.०

बुलडाणा---२७.८---२२.३

‎ब्रह्मपुरी---२७.०---२३.४

‎चंद्रपूर---२७.०---२३.४

‎गडचिरोली---२६.२---२३.०

‎गोंदिया---२७.०---२३.८

‎नागपूर---२७.४---२४.४

‎वर्धा---२७.०---२३.८

‎वाशीम---२९.०---२२.६

‎यवतमाळ---३०.०---२३.४

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SBI Inflation Report : युद्ध आणि एल-निनोमुळे २०२६ मध्ये महागाई वाढेल; एसबीआयचा अहवाल

Global Transport System: हवाई, जल वाहतुकीची वैशिष्ट्ये

Farmer Training: कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन

Farmer Crying Video Viral: शेतकरी बाजारात ढसाढसा रडला, 'व्हिडिओ व्हायरल'नंतर अधिकारी निलंबित

Chana Procurement: जालना जिल्ह्यात सहा केंद्रांवरून साडेसात हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT