Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain: बुधवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढणार; गुरुवारी आणि शुक्रवारी आणखी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

monsoon alert : आज राज्यात सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. तर काही ठिकाणी ढगाळ वातावारणासह ऊन सावल्यांचा खेळही पाहायला मिळाला.

अनिल जाधव

imd alert : राज्याच्या काही भागात हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्ही उघडीप दिली. आज राज्यात सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. तर काही ठिकाणी ढगाळ वातावारणासह ऊन सावल्यांचा खेळही पाहायला मिळाला. पण विदर्भात पुन्हा पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

राज्यात आज केवळ पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर नाशिक, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. उद्याही राज्यात पावसाची उघडप राहण्याची शक्यता आहे. पण कोकणात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

बुधवारपासून मात्र राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. बुधवारी विदर्भात ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशाराही देण्यात आला. गुरुवारीही विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

शुक्रवारी मात्र राज्याच्या इतर काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड, जळगाव, नगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT