Pune Rain Update : राज्यात मॉन्सूनचे आगमन दणक्यात झाले आहे. रविवारी (ता.२५) मुंबईसह कोकणात पावसाने चांगलाच जोर धरला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहिले. खरिपाच्या पेरण्यांसाठी सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
रविवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबई उपनगरातील दहिसर येथे सर्वाधिक २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरही मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोटातही पावसाला सुरूवात झाली आहे.
रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील राज्यातील पाऊस (मि.मी) (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण : दहिसर २२०, सांताक्रूज १८०, तळा १५०, माथेरान, हर्णे, पालघर प्रत्येकी १४०, पनवेल १३०, लांजा १२०, कणकवली, दापोली, मंडणगड प्रत्येकी ११०, माणगाव, पोलादपूर प्रत्येकी १००, श्रीवर्धन,
अंबरनाथ, देवगड, मालवण, रोहा, कर्जत प्रत्येकी ९०, म्हसळा, वसई, खालापूर, वाकवली ८०, गुहागर, मलदे, पेण, म्हापसा, रामेश्वर, वैभववाडी, कुडाळ, भिवंडी, डहाणू प्रत्येकी ७०, चिपळूण, खेड, राजापूर प्रत्येकी ६०.
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ११०, गगनबावडा ९०, शेवगाव ८०, सोलापूर, ७०, राहाता, पाथर्डी प्रत्येकी ५०, येवला, माळशिरस, वाई, चंदगड प्रत्येकी ४०. अकोले, आजरा, बारामती, पौड प्रत्येकी ३०.
मराठवाडा : उदगीर ७०, देवणी ५०, गंगापूर, शिरूर अनंतपाळ प्रत्येकी ४०, निलंगा, रेणापूर, कळंब, चाकूर प्रत्येकी ३०.
घाटमाथा : खंद ८०, डुंगरवाडी, कोयना, भिरा, आंबोणे प्रत्येकी ७०, दावडी, खोपोली, ताम्हिणी प्रत्येकी ६०, लोणावळा ५०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.