Rain Update  Agrowon
हवामान

Weather News : कोलकत्यात मुसळधार; राजस्थानात हलका ते मध्यम पाऊस

Monsoon News: देशाच्या अनेक राज्यांत मॉन्सून सक्रिय झाला असून राजस्थान तसेच प. बंगालची राजधानी कोलकत्यात बुधवारी (ता. २८) मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Latest Rain Update : देशाच्या अनेक राज्यांत मॉन्सून सक्रिय झाला असून राजस्थान तसेच प. बंगालची राजधानी कोलकत्यात बुधवारी (ता. २८) मुसळधार पावसाने हजेरी लावली. राजस्थानात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली.

त्याचप्रमाणे, गोव्यातही यंदा काहीशा उशिराने दाखल झालेला वरुणराजा मनसोक्त बरसत असून हवामान खात्याने गुरुवारपर्यंत (ता. २९) राज्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोलकत्यात तसेच आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत डायमंड हार्बरमध्ये सर्वाधिक २१४ मिमी पावसाची नोंद झाली. कॅनिंगमध्ये ५८ मिमी आणि कोलकत्यात ४० मिमी पाऊस पडला.

हवामान खात्याने दक्षिण आणि उत्तर २४ परगणा या किनारी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला. राजस्थानच्या अनेक भागांतही हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

बांसवाडात सर्वाधिक १०० मिमी तर नागौर जिल्ह्यातील जयालमध्ये ८० मिमी, नाशिराबादेत ७० मिमी पाऊस पडला. राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, बिनव्याजी कर्ज पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती

E Crop Survey: पावसाने मोठे नुकसान, पण ‘ई-पीक पाहणी’च नाही!

Revenue Department: महसूल विभागातील तिघे बडतर्फ, तवढेच निलंबित

Oilseed Production: टोकण पद्धतीच्या अवलंबाने तेलबियांच्या उत्पादनात वाढ

Saline Water Problem: सिंचनाच्या पाण्यात क्षार वाढण्याची कारणे आणि त्यावर उपाय

SCROLL FOR NEXT