Rain  Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यात उद्या जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाड्यातील अनेक भागातही मुसळधारेचा इशारा

Rain Update : हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावासाचा अंदाज दिला. तर उद्या राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात पावसाची हजेरी सुरुच आहे. तर काही भागात आजही जोरदार पावसाची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावासाचा अंदाज दिला. तर उद्या राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही जोरदार पाऊस पडेल, असे संकेत आहेत. तर इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

उद्या राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर ठाणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलडणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT