Rain Update  Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Team Agrowon

Weather Update Pune : मॉन्सून सक्रिय असल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. आज (ता. २९) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात तापमान ३१ अंशांच्याही खाली घसरले आहे. बुहतांश ठिकाणी तापमान २५ ते ३१ अंशाच्या दरम्यान असून, बहुतांश ठिकाणी पारा सरासरीच्या खाली घसरला आहे.

ईशान्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली वायव्य आणि पश्चिम दिशेकडे सरकणार आहे.

वायव्य राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम विस्तारला आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे कायम असून, महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आज (ता. २९) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्गसह मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दोन दिवसांत मॉन्सून देश व्यापणार

देशात मॉन्सूनची वेगाने घोडदौड सुरू असून, देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. बुधवारी (ता. २८) संपूर्ण अरबी समुद्र राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत हरियाणा, पंजाबसह राजस्थानच्या उर्वरित भागासह संपर्ण देशभरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (आरेंज अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा,

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, सिंधुदुर्ग, नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT