monsoon agrowon
हवामान

Monsoon 2023 : राज्यात पावसाची उघडीप कायम; ढगाळ वातावरणाचाही अंदाज

Rain Update : सध्या पावसाने उघडीप पडली असली, तरी तरी अधूनमधून तुरळक सरी येत आहेत. पण अनेक भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस पडला नाही.

Team Agrowon

IMD forecast : मॉन्सूनचा आस असेलला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. तर राज्यात पावसाची उघडीप कायम आहे. आज राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर अनेक भागात ढगाळ वातावरणाचाही अंदाज आहे. 

ईशान्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे कायम असून, अमृतसरपासून, चंडीगड, बहारिच, मुझफ्फराबाद, बालूरघाट ते मिझोराम पर्यंत सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभगााने आज नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदजा आहे. तसेच राज्यातील अनके ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला. तर उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून, ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT