Vidarbha Rain Agrowon
हवामान

Vidarbha Heavy Rain : पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी

Team Agrowon

Pune News : राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. तर पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण आहे. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मंगळवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदियातील कामठा येथे सर्वाधिक २९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पूर्व विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. तर या भागातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या भागातील १३ मंडलांत २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. तर ५० मंडलात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. तर विदर्भाच्या पश्चिम भागातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत अंशतः ढगाळ वातावरण होते. बुलडाण्यातील शेगाव येथे ४८ मिलिमीटर, अमरावतीतील चिखलदरा, टेंभूरसोंडा येथे ३५ मिलिमीटर, सेमडोह ४१ मिलिमीटर पाऊस पडला.

मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. कोकणात पाऊस नसला तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. रायगडमधील इंदापूर, निजामपूर येथे ४३ मिलिमीटर, तर पवयंजे, बिरवडी ३६, मोराबी ३४ मिलिमीटर पाऊस पडला. रत्नागिरीतील भरणे येथील ६७ मिलिमीटर, तर चिपळूण ५३, खेर्डी, धामणंद ५२, मार्गताम्हाणे ३८, रामपूर ३६, सावर्डे ३१, कळकवणे ३२, वाकवली, खेड ३०, आंबवली ३४, कुळवंडी ४२ मिलिमीटर, पालघरमधील तलसरी येथे ३८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. घाटमाथ्यावर पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत.

खानदेशात पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी कडक ऊन पडत असल्याने शेतीकामे वेगात सुरू झाली आहे. मात्र, धुळे जिल्ह्यातील बोराडी येथे ४४ मिलिमीटर, नंदुरबारमधील खापर येथे १४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून मोलगी, वडफळी येथे ६१ मिलिमीटर, शहादा ३५, मोरांबा ३६, कोरीट ३० मिलिमीटर पाऊस झाला. जळगावमधील शेंदुर्णी येथे ३२ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ४४ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात अधूनमधून शिडकावा झाला. मराठवाड्यातील छत्रपतीसंभाजीनगरमधील सोयगाव येथे अवघा २९ मिलिमीटर पाऊस झाला. इतर भागात पाऊस नसल्याने पिके वाफसा अवस्थेत येऊ लागली आहेत.

येथे झाला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस : भिवापूर ११२, मंधाळ, पाचखेडी १२७, असगाव, मासाळ १०३, साकोली, आकोडी १३०, सांगडी १०९, विरली, लाखंदूर १३९, लाखनी १०१, पालंदूर १०८, विरली १२६, रत्नारा १६४, दासगाव १५०, गोंदिया १६१, काट्टीपूर १३१, आमगाव १४६, तिगाव १५२, ठाणा १२८, कुऱ्हाडी १७४, मोहाडी १४७, तिल्ली १९०, शिखारीटोळा १५१, सिंदीबिरी १९४, नवेगावबांध १०५, बोधगाव देवी, अर्जुनी १४९, महागाव १६०, केशोरी १४८, सौदाद १४२, सडक अर्जुनी १७५, शेंदा १८०, कोसामतोंडी १९७,नावरगाव १४१, शिंदेवाही, मोहाली १०६, सावळी १०६, मुरूमगाव ११९, चाटेगाव १०५, कोर्ची १७९, बेडगाव १६३, कोटगुळ १३०, मासेळी १२०, देसाईगंज १५५, मुलचेरा १३२, ब्रम्हपुरी, चौगण, अन्हेर, मेंढा १०२.

येथे पडला २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस

रावणवाडी २५१, खामरी २१४, कामठा २९२, कुडवा २२२, कवरबांध २१७, सालकेसा २०७, आमगो खुर्द २०७, मुल्ला २२४, देवरी २०७, चिंचगड २०४, गोरेगाव २१८, काकोडी २२१, दारव्हा २३९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT