Winter Weather Agrowon
हवामान

Hawaman Andaj: राज्यात तापमान सरासरीपेक्षा जास्तच; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानातील चढ उतार कायम

Winter Weather Forecast: राज्यातील थंडी आजही कमीच होती. सरासरीपेक्षा अद्यापही थंडीचा कडाका कमीच आहे. काही भागात थंडी कमी जास्त होत असली तरी अपेक्षित असा थंडीचा कडाका जाणवत नाही.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील थंडी आजही कमीच होती. सरासरीपेक्षा अद्यापही थंडीचा कडाका कमीच आहे. काही भागात थंडी कमी जास्त होत असली तरी अपेक्षित असा थंडीचा कडाका जाणवत नाही. तर काही भागात किमान तापमानात घट होत असल्याने थंडीही वाढत आहे. राज्यातील बहुतांशी भागात तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी जास्त आहे. उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याची चादरही पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमाात चढ उतार होत आहेत. त्यामुळे काही भागात थंडी कमी झाली होती. एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रावातांमुळे थंडी कमी-अधिक होत आहे.

आज पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. वायव्य भारतात १३५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत.

उत्तर भारतातून येणारे थंड वाऱ्याचे प्रवाह काहीसे कमी झाल्याचा परिणाम राज्यातील थंडीवर जाणवत आहे. त्यामुळे अनेक भागात थंडी कमी झाली होती. तर किमान तापमानात चढ उतार सुरुच आहेत.

आज राज्यातील किमान तापमान १० अंशाच्याही पुढे होते. आज निफाड येथील गहू संशोधन केद्रात १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्यातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर तापमानात घट होऊन थंडीमध्येही वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance: केळी, आंब्याला हवामान आधारित विमा परतावा मंजूर

Agriculture Irrigation: ‘विष्णुपुरी’तून दोन पाणीपाळ्या मिळणार

Environment Protection: झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले !

Satara District Bank: सातारा जिल्हा बॅंकेचे कामकाज उल्लेखनीय : बाबासाहेब पाटील

Dairy Development Project: विदर्भ, मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT