Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave : विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा

Monsoon Update : मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी, उन्हाचा चटका आणि उकाडा टिकून आहे. राज्यात पावसाची जोरदार प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी, उन्हाचा चटका आणि उकाडा टिकून आहे. राज्यात पावसाची जोरदार प्रतीक्षा आहे. आज (ता. २१) तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट) कायम राहण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

पावसाला पोषक हवामान होताच, राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू झाले आहेत. मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात तापमान ३३ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात जोरदार वारे वाहत असून, ढगाळ हवामान होत आहे. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने, तसेच सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भातील अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे उष्णतेची लाट आहे.

वायव्य मध्य प्रदेश, ईशान्य राजस्थानमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. सिक्कीमपासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

त्यापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. केरळच्या किनाऱ्यालगत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विदर्भातील उष्ण लाट आज (ता. २१) कायम राहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’

आठवडाभरापासून थांबलेली मॉन्सूनची वाटचाल सोमवारी (ता. १९) पुन्हा सुरू झाली. कर्नाटक, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, पश्‍चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्याच्या काही भागांत मॉन्सूनने आगेकूच केली.

मंगळवारी (ता. २०) मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. शुक्रवारपर्यंत (ता. २३) दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पश्‍चिम बंगाल, झारखंड, बिहारचा आणखी काही भाग, तसेच ओडिशा आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३४.७ (२३.७), जळगाव ३९.३ (२७), धुळे ३८ (-), कोल्हापूर ३४.६ (२३.६), महाबळेश्‍वर २३ (१८.१), नाशिक ३३.२ (२३.७),

निफाड ३३.८ (२५.२), सांगली ३५.७ (२३.३), सातारा ३४.५ (२३.५), सोलापूर ३८.७ (२५.४), सांताक्रूझ ३३.९ (२८.४), डहाणू ३३.४ (२७.९), रत्नागिरी ३३.५ (२६.४),

छत्रपती संभाजीनगर ३६ (२२.८), नांदेड ३९.२ (२८.७), परभणी ३८.४ (२७), अकोला ३९.८ (२८.६), अमरावती ४०.६ (२६.४), बुलडाणा ३७.५ (२५.२), ब्रह्मपुरी ४२ (३०.२),

चंद्रपूर ४२.४ (३०.२), गडचिरोली ४०.२ (२८.२), गोंदिया ४१.२ (२८.२), नागपूर ४१.२ (२९.४), वर्धा ४१ (३०.४), वाशीम ३९.४ (२६.२) यवतमाळ ३९.५ (२६.५).

उष्ण लाटेचा इशारा :

अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

चंद्रपूर ४२.४, ब्रह्मपुरी ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT