Heat wave  Agrowon
हवामान

Heat Wave : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Summer Heat Update : सूर्य तळपल्याने राज्यात उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. दिवस उन्हाचा चटका कायम असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहेत.

अमोल कुटे

Pune News : सूर्य तळपल्याने राज्यात उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. दिवस उन्हाचा चटका कायम असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहेत. अकोला आणि वाशीम येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत देशात उष्ण ठरले आहेत. आज (ता. ३०) विदर्भात उष्ण लाट, राज्यात अनेक ठिकाणी उष्ण रात्र, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कमाल तापमान चाळिशी पार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. तर कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असताना, रात्रीच्या किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्ण लाट समजली जाते. सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, विदर्भसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्ण रात्री अनुभवायला मिळत आहेत.

शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला व वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. आज (ता. ३०) विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. राज्यात अनेक ठिकाणी उष्ण रात्र, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाची ताप वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३८.६, नगर ३९, धुळे ४१, जळगाव ४१.५, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्‍वर ३१.९, मालेगाव ४१.२, नाशिक ३९.२, निफाड ३७.९, सांगली ३८.८, सातारा ३८.५, सोलापूर ४१, सांताक्रूझ ३२.३, डहाणू ३३.३, रत्नागिरी ३२.६,

छत्रपती संभाजीनगर ३८.८, बीड ४०.४, नांदेड ४०.८, परभणी ४१.६, अकोला ४२.६, अमरावती ४१.६, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४१, चंद्रपूर ४१.२, गडचिरोली ३८.६, गोंदिया ३९.५, नागपूर ४०.२, वर्धा ४१.५, वाशीम ४२.६, यवतमाळ ४१.५.

वादळी पावसाची शक्यता कायम

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून अंतर्गत कर्नाटक, मराठवाडा ते उत्तर तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

नाशिकसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३०) जळगाव, लातूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

- उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ

- उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ

- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, लातूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ

४१ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४२.६, वाशीम ४२.६, परभणी ४१.६, अमरावती ४१.६, जळगाव ४१.५, वर्धा ४१.५, यवतमाळ ४१.५. चंद्रपूर ४१.२, मालेगाव ४१.२, धुळे ४१, सोलापूर ४१, ब्रह्मपुरी ४१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Machinery Subsidy: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवजारे खरेदीसाठी अनुदान, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २० कोटींच्या निधीस मंजुरी

Farmer Loss: पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

Fertilizer Scam: जादा दराने खते, बियाणे विकणारी दुकाने तपासा

Atpadi Pani Tanchai: तीव्र पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आटपाडी

Land Records Scam: जमिनीच परस्पर नावावर केल्या, पुण्यातील १२ अधिकाऱ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT