Heat Wave  Agrowon
हवामान

Heat Wave : मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढत आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढत आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे. मंगळवारी (ता. १६) मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट) तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान झाले होते. बुधवारी (ता. १७) धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे देशातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य भारतासह राज्याच्या काही भागाच्या कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता. १६) उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.९, धुळे ३८.०, जळगाव ३९.०, कोल्हापूर ३८.४, महाबळेश्वर ३३.३, मालेगाव ४१.०, नाशिक ३८.४, निफाड ३७.१, सांगली ३८.३, सातारा ३९.६, सोलापूर ३८.६, सांताक्रूझ ३३.२, डहाणू ३२.३, रत्नागिरी ३३.२,

छत्रपती संभाजीनगर ३७.४, बीड ३८.९, नांदेड ३६.६, अकोला ३९.४, अमरावती ३५.६, बुलढाणा ३७.०, ब्रह्मपूरी ३८.२, चंद्रपूर ३८.२, गडचिरोली ३५.६, गोंदिया ३६.४, नागपूर ३६.०, वर्धा ३६.५, वाशीम ३८.६, यवतमाळ ३७.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT