Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat : उन्हाचा चटका, उकाडा कायम

Summer Season : सूर्याची ताप वाढल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्याच्या कमाल तापमानात घट झाल्याने उष्णतेची लाट ओसरली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : सूर्याची ताप वाढल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्याच्या कमाल तापमानात घट झाल्याने उष्णतेची लाट ओसरली आहे.

मात्र राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. आज (ता. १७) कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस, तर अमरावती आणि चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३६ ते ४३ अंशांच्या दरम्यान होते.

उत्तर बिहारपासून मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज (ता. १७) राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याबरोबरच, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.५ (२३.१), जळगाव ४२ (२७.४), धुळे ४१, कोल्हापूर ३५.२ (२३.४), महाबळेश्वर ३०.८ (१७.६), नाशिक ३६.१ (२३.६),

निफाड ४२.४ (२३.३), सांगली ३७.५ (२३), सातारा ३६.७ (२२.५), सोलापूर ४०.६ (२४.६), सांताक्रूझ ३४.३ (२८.६), डहाणू ३६.२ (२८.५), रत्नागिरी ३४.६ (२६.६),

छत्रपती संभाजीनगर (२२.८), नांदेड - (२५.६), परभणी ४०.८ (२४.८), अकोला ४२.८ (२७.२), अमरावती ४३ (२६.१), बुलडाणा ३८.५ (२४.६), ब्रह्मपुरी ४२.४ (२६),

चंद्रपूर ४३.०(२६.४), गडचिरोली ४१.६(२४.८), गोंदिया ४१.५ (२३.२), नागपूर ४३.२ (२५.९), वर्धा ४३.१(२७.४), यवतमाळ ४२.५ (२६.७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT