Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढतोय

राज्यात वादळी पावसाने उघडीप दिली असली तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. यातच राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढला असून, अनेक ठिकाणी पारा ३६ अंशांपार पोचला आहे.

Team Agrowon

Weather Update Pune राज्यात वादळी पावसाने उघडीप दिली असली तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. यातच राज्यात उन्हाचा चटका (Summer Heat) पुन्हा वाढला असून, अनेक ठिकाणी पारा ३६ अंशांपार पोचला आहे.

आज (ता. ८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सोलापूर येथे ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. किमान तापमानातही वाढ कायम असून, उन्हाच्या चटक्या बरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे.

उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर, तसेच ईशान्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ८) मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता आहे.

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.३ (२३.०), जळगाव - (२५.५), धुळे ३८.० (२२.४), कोल्हापूर ३५.६ (२३.०), महाबळेश्वर ३०.१ (१९.३), नाशिक ३४.६ (२१.८),

निफाड ३६.१ (२४.४), सांगली ३६.९ (२३.६), सातारा ३६.९ (२३.०), सोलापूर ३८.२ (२६.०), सांताक्रूझ ३२.९ (२७.४), डहाणू ३३.२ (२७.४), रत्नागिरी ३३.४ (२४.६),

छत्रपती संभाजीनगर ३६.० (२३.८), नांदेड ३३.८ (२४.८), परभणी ३७.८ (२२.६), अकोला ३८.८ (२७.०), अमरावती ३७.४(२३.५), बुलढाणा ३५.४ (२३.४), ब्रह्मपूरी ३७.४ (२५.०),

गडचिरोली ३६.८(२४.८), गोंदिया ३६.२ (२४.५), नागपूर ३७.२ (२४.५), वर्धा ३७.५(२६.०), वाशीम ३५.६ (२२.६), यवतमाळ ३७.२ (२५.०).

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र, : नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : धाराशिव, लातूर.

कमी दाब क्षेत्राची होणार निर्मिती

आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आजपर्यंत (ता. ८) कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून उत्तर अंदमान समुद्राजवळ चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत. ही वादळी प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT