Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat : उन्हाच्या झळांनी चटका, उकाड्यात वाढ

Maharashtra Weather News : मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी पावसानंतर मे महिन्यात राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune News : मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी पावसानंतर मे महिन्यात राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.

विदर्भात उन्हाचा चटका अधिक असून, ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला आहे. आज (ता. २२) तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.४ तापमानाची नोंद झाली. विदर्भात उन्हाची ताप चांगलीच वाढली असून, अनेक ठिकाणी पारा ४३ अंशांच्या पुढे गेला आहे.

कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३८ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या असून, कोकणासह राज्यात उष्ण व दमट हवामानामुळे घामटा निघत आहे.

बिहारपासून, छत्तीसगड ते उत्तर तेलंगणापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. तर विदर्भ, मराठवाडा ते अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आज (ता. २३) उष्ण व दमट हवामानामुळे राज्यात चटका आणि उकाडा त्रासदायक ठरत आहे. मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.५ (२२.८), जळगाव ४३.५ (२६.५), धुळे ४१.६ (-), कोल्हापूर ३८.२ (२३.६), महाबळेश्वर ३३.२ (२०.०), नाशिक ३७.५ (२१.८),

निफाड ३९.६ (२२.८), सांगली ४०.४ (२३.९), सातारा ३९.२ (२३.०), सोलापूर ४२.५ (२६.९), सांताक्रूझ ३३.६ (२६.७), डहाणू ३३.७ (२७.५), रत्नागिरी ३४.४ (२६.७),

छत्रपती संभाजीनगर ४१.४(२४.४), नांदेड ४१.८ (२६.२), परभणी ४३.४ (२७.१), अकोला ४४.४ (४२.६), अमरावती ४२.६(२५.१), बुलढाणा ४०.७ (२७.०), ब्रह्मपूरी ४२.२ (२६.४),

चंद्रपूर ४३.४(२७.४), गोंदिया ४२.६ (२६.८), नागपूर ४३.० (२५.१), वर्धा ४४.०(२७.५), वाशीम ४२.२(२६.८) यवतमाळ ४१.५ (२५.०).

मॉन्सूनची वाटचाल जैसे थे

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल झाले. रविवारी (ता. २०) मॉन्सूनची वाटचाल जैसे थे होती. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT