Rain Gauge Maharashtra agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात आजही उष्णता वाढ, पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात तापमान वाढीचा अंदाज

Rain Update : राज्यातील बहुतांशी भागात ऊन वाढले आहे. तर विदर्भातील काही भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे.

अनिल जाधव

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात ऊन वाढले आहे. तर विदर्भातील काही भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. हवामान विभागाने आजही विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट आणि पावसाचा अंदाज दिला. तर राज्यातील बहुतांशी भागांमध्ये तापमानात वाढ होऊ शकते, असाही अंदाज दिला.

कमाल तापमान चाळिशी पार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. तर कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असताना, रात्रीच्या किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्ण लाट समजली जाते.

सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, विदर्भसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्ण रात्री अनुभवायला मिळत आहेत. अकोला येथे देशातील सर्वाधिक ४२.६ अंशाची नोंद झाली.

तर राज्यातील काही भागात पावसाची अंदाज आहे. हवामान विभागाने आज नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT